पश्चिम घाट, निसर्गाने भारताला दिलेले एक वरदान आहे. भारताच्या पश्चिमेला गुजरात पासून ते केरळ पर्यंत १६०० कि मी पसरलेली हि पर्वतरांग जगातील मोजक्या बायो डायव्हरसीटी हॉट स्पॉट पैकी एक आहे. पश्चिम घाटात अनेक असे प्राणी आहेत कि जे फक्त इथेच सापडतात आणि जगात इतरत्र कुठे नाही आणि या मुळेच पश्चिम घाटात असलेल्या विविध अभयारण्यांचे अतिशय महत्व आहे. भद्रा राष्ट्रीय उद्यान हे पश्चिम घाटातले असेच एक खास जंगल आहे.
कर्नाटकातील प्रसिद्ध तुंग व भद्रा या दोन नद्यांपैकी भद्रा या नदी च्या खोर्यामध्ये भद्रा राष्ट्रीय उद्यान वसलेले आहे. मध्यभागी भद्रा नदी चे खोरे आणि आजूबाजूने मुल्लैन्गिरी, हेब्बेगिरी, गंगेगिरी व बाबाबुन्दागिरी या पर्वतरांगा यांमध्ये अंदाजे ४९५ वर्ग कि मी परिसरात भद्रा चे जंगल पसरलेले आहे. परिसराची सर्वसाधारण उंची ७५० मी ते २१०० मी अशी असून कल्लाहाथीगिरी नावाचे १६७५ मी उंचीचे शिखर व हेब्बेगिरी नावाचे अंदाजे १८७६ मी उंचीचे शिखर हे अभयारण्य परिसरातील सर्वात उंच शिखरे आहेत. भद्रा नदीच्या अंदाजे २००० वर्ग कि मी जलसंधारणाच्या क्षेत्रफळापैकी एक चतुर्थांश क्षेत्र भद्रा अभयारण्याचे आहे. कर्नाटकातील लाखो लोकांची तहान व शेती या परिसरात पडणार्या पावसावर अवलंबून आहे.
भद्रा राष्ट्रीय उद्यानाचा १९९८ साली प्रोजेक्ट टायगर मध्ये २५ वा व्याघ्र प्रकल्प म्हणून समाविष्ट केला गेला. कमी जास्त होत होत आज अंदाजे ३० वाघ या अभयारण्यात आहेत. या जंगलाचे वैशिष्ठ्य म्हणजे हे जंगल फक्त वाघांसाठी प्रसिद्ध नसून हत्तींसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. ३० वाघांसोबत या जंगलात अंदाजे २०० हत्ती सुद्धा आढळून येतात. तसेच साधारण २० बिबटे, १८० गवे अन ५०० हून अधिक चितळ व सांबर या जंगलात नोदावले गेले आहेत. अस्वल, मलबारी शेकरू, पिसोरी हरीण, उडती खार असे काही इतर प्राणी सुद्धा सापडतात. अभयारण्य परिसरात अंदाजे ३५० पक्षी नोंदवले गेले आहेत. त्यातील काही फक्त पश्चिम घाटात आढळणारे असे आहेत. उत्तम वर्षावन असल्यामुळे येथे सापांच्या अनेक प्रजाती सापडतात व त्यांची संख्या सुद्धा भरपूर आहे. तसेच त्यांना खाऊन जगणारा नागराज किंवा किंग कोब्रा सुद्धा या जंगलात सापडतो. ह्या जंगलात १२० प्रकारचे वृक्ष प्रकार नोंदवले गेले आहेत त्यात प्रामुख्याने साग, किन्दल, माथी, होने, जांभूळ, आंबा या प्रकारची झाडे आहेत. या जंगलाचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे उंचावरचा भागामध्ये थोड्या प्रमाणात शोला पद्धतीचे जंगल सुद्धा पहावयास मिळते.
भद्रा ला पोहोचण्याकरिता शिमोगा व चिकमंगळूर या दोन शहरांमधून जाता येते. शिमोगा वरून दक्षिण पश्चिमेला अन्द्दजे ४० कि मी वर भद्रा वरील धरणाची भिंत लागते. ह्याचा मागील बाजूने जंगल परिसर सुरु होतो. पण ह्या परिसरात सपाट प्रदेश अजिबात नसून फिरणे खूप कष्टदायक आहे. म्हणून निसर्गप्रेमी सहसा चिकमंगळूर वरून जाणे पसंत करतात. चिकमंगळूर वरून ३८ कि मी उत्तर पश्चिमेला जंगल सुरु होते. तेथूनच पुढे मुथोडी नावाच्या जागी कर्नाटक वनविभागाने रहाण्याची सोय केली आहे. कर्नाटक वनविभागाशी संपर्क साधून , पूर्व परवानगी घेऊन येथे रहाण्याची सोय होऊ शकते. जंगलामध्ये फिरण्याकरिता वनविभागाने जंगलाच्या विविध भागांमध्ये कच्चे रस्ते केले आहेत. आपली गाडी घेऊन जंगलातून फिरता येते. पण त्या करीन सोबत वनविभागाचा गार्ड असणे गरजेचे आहे. हे जंगल व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे ह्या जंगलात पायी फिरण्यास परवानगी नाही. तसेच जंगलात हत्ती असल्यामुळे ते सुरक्षितही नाही.
हे जंगल मार्च ते मे या काळात बंद असते. जून ते सप्टेंबर या काळात भरपूर पाउस असतो. या काळात तुम्ही जंगलात जाऊ शकता पण ते कष्टदायक असते. खालून जळवा व वरून बेदम पाउस अशी स्थिती असते. या काळात सरीसृप व उभयचर प्राण्यांच्या अभ्यासासाठी जावे. नाहीतर या जंगलाचा सर्वोत्तम काल ऑक्टोबर ते फेब्रुवारी असा आहे. जंगलात फिरताना पटापट काही दिसेल अशी अपेक्षा ठेऊन जाऊ नये. सदाहरित व घनदाट जंगल असल्यामुळे प्राणी, अगदी हत्ती सुद्धा सहजतेने लपून जातो. पण जे जे समोर येईल ते बघत राहावे. नीट बघायला सुरु केल्यास मुंगी पासून हत्ती पर्यंत सर्वच गोष्टी थरारक वाटतील.
शाळेत असताना आपण सर्वजण एक प्रतिज्ञा म्हणतो "भारत माझा देश आहे" त्यातील एक ओळ आहे ती थोडीशी बदलून म्हणावसं वाटतं " भारतातील विविधतेने नटलेल्या जंगल संपदेचा मला अभिमान आहे , या समृद्धतेच्या वारसाची पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन"
- Pinakin Karve
Published in Ma Ta,
Friday 27th 2011
May 25, 2011
May 10, 2011
बोंडला अभयारण्य
एक काळ असा होता कि भारत देश हा वाघ आणि गारुड्यांचा (snake charmers) देश म्हणून ओळखला जायचा. खूप मोठ्या प्रमाणात आणि विविध प्रकारची जंगले यामुळे भारतात प्रचंड प्रमाणात जैववैविध्य वसत होते. गेल्या शंभर - दोनशे वर्षांचा विचार केल्यास ह्याचा प्रचंड प्रमाणात ह्रास झाला आहे. तरीपण आज देशाचा विविध भागांमध्ये उत्तम प्रतीचे जंगला टिकून आहे आणि त्यात जुन्या जंगल संपदेचा अंदाज येईल इतपत अजून शिल्लक आहे. अशाच काही खास जागांमध्ये गोव्यातील बोंडला अभयारण्य येते.
अनेकांना गोवा म्हणजे फक्त समुद्रकिनारे असा वाटते पण त्या पलीकडे जाऊन गोवा राज्यामध्ये प्रचंड प्रमाणात जैववैविध्य आढळून येते. जवळ जवळ १००० प्रकारच्या वनस्पती, ४०० प्रकारचे पक्षी, २०० हून अधिक फुलपाखरांचा प्रजाती, ४० हून अधिक सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, साधारण तेवढ्याच प्रकारचे सरीसृप आणि असंख्य प्रकारचे इतर जीव. एवढे प्रचंड वैभव छोट्याशा गोवा राज्यात सामावले आहे. अर्थात समृद्ध जंगले असल्याशिवाय हे शक्य नाही. बोंडला अभयारण्य अशाच खास जंगलांमध्ये येते.
फक्त ८ वर्ग किमी. मध्ये वसलेल्या ह्या अभयारण्याकडे पणजी बेळगाव रस्त्यावरील पोंडा ह्या गावातून रस्ता जातो. पणजी पासून अंदाजे ४० किमी तर पोंडा गावापासून अंदाजे १० किमी वर ह्या अभयारण्याचे मुख्य ऑफिस आहे. पणजी पासून पोंडाला येण्याकरिता स्थानिक बसेस मिळतात. तसेच पोंडा पासून बोंडला ला पोहोचण्याकरिता खासगी गाड्या भाड्याने मिळू शकतात. बोंडला मध्ये गोवा वन विभागाचे रेस्ट हाउस आहे. सर्व व्यवस्था मिळून अंदाजे ४० ते ५० लोक राहू शकतील अशी व्यवस्था आहे. त्याची पूर्व परवानगी योग्य ते शुल्क भरून गोवा वनविभागाकडून घ्यावी लागते. रेस्ट हाउस पासून थोड्या अंतरावर एक उत्तम प्राणी संग्रहालय आहे. गोव्यात आढळून येणारे काही निवडक प्राणी व विविध प्रकारचे सरीसृप या प्राणी संग्रहालयामध्ये बघायला मिळतात.
बोंडला अभयारण्य हे सदाहरित वन ह्या प्रकारातील असून त्यामध्ये काही वैशिष्ठ्यपूर्ण प्राणी सापडतात. मलबार जायंट स्क्वीरल किंवा मराठीत ज्याला मलबारी शेकरू म्हणतात ते ह्या जंगलामध्ये सहजपणे आढळून येतात. रेस्ट हाउस चा पाठीमागे असलेल्या उंच वृक्षांच्या फांद्यांवर लक्ष ठेवल्यास पटकन दिसून जातो. आजू बाजूला चालत फिरताना चितळ, सांबर, भेकर सारखे प्राणी सहज दिसून जातात. ह्या जंगलामध्ये बिबट्याचा वावर आहे पण घनदाट जंगल असल्यामुळे त्याचे दर्शन अत्यंत दुर्मिळ आहे. एकदा प्राणी संग्रहालयातील मादी बिबट्याच्या वासाने एक नर बिबटा प्राणी संग्रहालयात घुसला होता व ते सांभाळताना वनविभागाची गडबड उडाली होती. ह्या जंगलामध्ये अशा गमती जमती होत असतात. तुम्ही जर रेस्ट हाउस मध्ये मुक्काम केलात तर जेवणाच्या जागेच्या आसपास पहाटे किंवा संध्याकाळी काही रानडुक्करे तुम्हाला घोटाळताना सापडतील. आजकाल जंगलातून दुर्मिळ झालेले पिसोरी हरीण म्हणजेच माउस डियर सुद्धा बोंडला मध्ये सापडते. फक्त ते अत्यंत लाजाळू असल्याकारणाने व फक्त रात्री बाहेर पडत असल्यामुळे बघायला मिळणे अवघड आहे. ओर्नेट फ्लाइंग स्नेक किवा उडता सर्प हा वैशिष्ठ्यपूर्ण व दुर्मिळ असा बिनविषारी साप ह्या जंगलात सापडतो. अंग चपटे करून एका झाडाच्या शेंड्यावरून दुसऱ्या झाडावर ग्लाईड करत जाणे हे ह्या सापाचे वैशिष्ठ्य. एका झेपेत जवळ जवळ ३० ते ५० मीटर अंतर हा साप कापू शकतो. ह्या शिवाय कित्येक प्रकारचे पक्षी व फुलपाखरे ह्यांचे हे अभयारण्य वसतीस्थान आहे.
तुम्ही खरे निसर्गप्रेमी असाल तर हे जंगल तुम्हाला कधीच निराश करणार नाही. कुठलाही ऋतू असो हे जंगल तुम्हाला सतत काहीतरी दाखवत राहील. दुर्बीण, कॅमेरा अशा वस्तू व प्राण्यांची माहिती देणारी विविध फिल्ड गाईड्स घेऊन जर तयारीने तुम्ही ह्या जंगलात शिरलात तर तुम्ही ह्या जंगलाचा अधिक चांगल्या प्रकाराने आनंद घेऊ शकता. गोव्याला जाऊन समुद्रकिनारे प्रत्येकजण बघून येतो. काहीतरी वेगळे करण्याची संधी हे जंगल तुम्हाला देते. तसेच निसर्ग वाचवा नुसते न बोलता जंगलाशी प्रत्यक्ष नाळ जोडल्यास काहीतरी कृती केल्यासारखे होईल.
पिनाकिन कर्वे
Published in MaTa on Friday 11th May 2011

May 9, 2011
बिन भिंतीची उघडी शाळा
आजकाल पेपरात अनेकदा विविध किल्ल्यांवर हरवलेल्या लोकांच्या बातम्या वाचतो. अनेकांना हे काहीतरी भयंकर घडले असे वाटते. पण प्रत्यक्षात तुम्ही कुठल्याही मुरलेल्या ट्रेकर ला विचाराल तर तो एकदाही हरवलेला नाही असे कधीच होत नाही. त्याने कधीच कोणाला फोन करून वाचवायला बोलावलेले नसते. ह्यामध्ये त्याचा वाट पाठ असतात असे नव्हे पण महत्वाचे असते ते म्हणजे परिस्थितीचे आकलन करून व डोकं शांत ठेऊन बरोबर वाट शोधून काढण्याची कला येणे. ही काही वर्गात शिकवून येणारी किंवा एका दिवसात कळणारी गोष्ट नव्हे. त्याकरता सातत्याने विविध ठिकाणी भटकंती करून अनुभवांची शिदोरी गोळा करणे गरजेचे आहे. आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचे अनुभव ऐकून त्यातुक शिकणे गरजेचे आहे. आज आमच्या सारखी जी लोक व्यवसाय म्हणून साहसी भटकंती या क्षेत्रात काम करतो ते सर्व विविध अनुभवातून शिकूनच शहाणे झालेले असतात. माझ्या जडणघडणीत ज्या एका ट्रेक ने महत्वाची भर घातली त्याचा हा अनुभव.
अनेकदा एखाद्या गडाचे नाव ऐकून तेथे जावेसे वाटते आणि केवळ ऐकीव माहितीवर जायला सुरुवात करतो. अशा वेळी पुढील घटनांची आपणांस कल्पना नसते आणि पर्वाही नसते. आम्ही मोठ्या उत्साहात जीवधन-नाणेघाट-भैरवगड अशा तीन दिवसाच्या ट्रेकसाठी निघालो होतो. थेट बस ची वेळ नीट माहिती नसल्यामुळे प्रवासाची सुरुवातच बस चुकण्याने झाली. तरीपण न डगमगता शिवाजीनगर-नारायणगाव-जुन्नर-घाटघर अशा तीन एस.टी. मधून प्रवास करून एकदाचे जीवधन गडाच्या पायथ्याशी पोहोचलो.
वाटाड्यांना वाटेस लाऊन आम्ही आत्मविश्वासाने चढाई सुरु केली. गडाची वाट ओढ्यातून जाते हे माहित असल्याने प्रथम ओढ्याचा शोध सुरु केला.येथून आमच्या अडचणींना सुरुवात झाली. बऱ्याच वेळाने गर्द झाडीतील एक ओढा निश्चित करून गड चढू लागलो.काही वेळाने आम्ही अशा ठिकाणी आलो जिथे गर्द झाडीने आमचा रस्ता रोखला. नंतर शोधाशोध करून आम्ही एका खड्या चढापाशी आलो. तो चढून आम्ही अशा चढापाशी आलो जेथून परतणे शक्य नव्हते आणि पुढचा मार्गही सापडत नव्हता. खाली बघितले तर पायथ्याशी गावातील टारगट पोरं जमली होती. आम्ही त्यांना वाट विचारली असता "वाघरू आले.. वाघरू आले" म्हणून घाबरवायला सुरुवात केली. तोपर्यंत प्रकाश कमी होण्यास सुरुवात झाली होती. शेवटी गडाचे नीट निरीक्षण करून एक मळलेली पाऊलवाट शोधून काढली व अंधार पडण्याच्या आत पोहोचायचे उद्दिष्ट ठेऊन वाटेतले अवघड रॉकपैच पार करून एकदाचे दुर्गावर पोहोचलो.
जीवधन हा जुन्नर विभागातील एक दुय्यम किल्ला असून हा कोकणच्या तोंडावर उभा असल्याने टेहळणीसाठी याचा वापर होत असे. नाणेघाट हा व्यापारी दृष्ट्या महत्वाचा असल्यामुळे त्याचा रक्षणासाठी असलेल्या जीवधन ला सुद्धा महत्व आले. शहाजी महाराजांनी एक काळ मुर्तजा या बालवयीन निजामशहाला हाताशी धरून जीवधन किल्ल्याच्या मदतीने आदिलशहाच्या सेनेशी लढा दिला होता. गडाला केवळ दोनच वाटा आहेत.बाजूचा वानरलिंगी सुळका प्रस्तरारोहणासाठी प्रसिद्ध आहे. पश्चिमेकडे नाणेघाट व नानाचा अंगठा, पूर्वेस जुन्नरपेठ, उत्तरेस भोरांड्याची नळी व दक्षिणेस उभा कडा आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळचे दोन तास स्वहस्ते चुलीवर न्याहारी करण्यात दवडले. पुढचा मोठा पल्ला गाठायचा असल्याने आवराआवर करून निघालो. येथून आमच्या पायपिटीला सुरुवात झाली. पूर्वेच्या वाटेने चढल्यामुळे आम्ही उतरायला पश्चिमेची चोर दरवाज्याची वाट घेतली. निम्मा गड उतरल्यावर आमची पुढची वाट खुंटली. चरफडतच पुन्हा चढून गडावर आलो. पुन्हा चढलेल्याच वाटेने उतरलो.
नाणेघाटात पोहोचण्यासाठी आता निम्म्या गडाला वळसा घालून जावे लागणार होते. टळटळीत उन्हातून तेथे पोहोचण्यास तास-दीड तास लागला. नाणेघाटात कोरलेले प्राचीन शिलालेख (ब्राह्मी लिपी) बघितले. नाणेघाट हा कोकणात उतरण्यासाठी पूर्वीपासून वापरात असलेला रस्ता आहे. याची निर्मिती सातवाहन राजकुळाने इ.स.पू. १०० - इ.स. ३०० दरम्यान केली.
नाणेघाटाच्या वरील अंगाचा नानाचा अंगठा चढून कोकण कड्याचे दर्शन घेऊन भोरांड्याच्या नळीच्या मार्गाला लागलो. उन्हातून चालताना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले. वाटेत कुठेही पाणी नसल्यामुळे व जवळचे पाणी काळजीपूर्वक वापरायचे असल्यामुळे तहान भागवण्यासाठी वाटेतील करवंदाच्या जाळ्यातील कच्ची करवंद व फुलं ओरबाडून खाऊ लागलो. बघता बघता भोरांड्याच्या नळीत शिरलो. अत्यंत अरुंद व न मळलेली वाट, पुरुषभर उंचीचे दगड ज्यावरून सतत उड्या मारत खाली उतरावे लागले. दोन अडीच तास उतरल्यानंतर सुद्धा सपाट प्रदेश लागत नव्हता. तोपर्यंत अंधार पडला. जरा वेळ शोधाशोध केल्यावर गाडी रस्ता सापडला. तो सापडल्यानंतर श्रमाने सर्वजण रस्त्यावरच आडवे पडले.सर्वांजवळचे पाणी संपले होते. पाण्याला अमृत का म्हणतात? हे आम्हाला तेव्हा कळले. कष्टाने तसेच उठून आम्ही मोरोशी या गावात पोहोचलो. गावाबाहेर नदीच्या पात्रात पाणी मिळाल्यावर जीव भांड्यात पडला. रात्री शाळा व मंदिर न सापडल्याने एका चावडीबाहेर मुक्काम केला. जेवणासाठी खिचडी तयार केली व जाऊन लवंडलो.
तिसऱ्या दिवशी चहा/न्याहारी करून भैरवगडाला भिडलो. कठीण चढणीचा हा भैरवगड आदल्या दोन दिवसांच्या श्रमामुळे अजूनच अवघड वाटू लागला. भैरवगड हा टेहळणी करण्यासाठी वापरला जाणारा गड आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील नैसर्गिक डाईक अश्मरचनेवरील उभारणी आणि गडावर असणारं बारमाही पाण्याचे टाके. भैरवगडावरील ही नैसर्गिक रचना प्रस्तरारोहकांसाठी आव्हानात्मक असूनही दुर्लक्षित राहिली आहे. असा हा भैरवगड उतरून आम्ही मोरोशीस परतलो. तेथून खचाखच भरलेल्या एस.टी.तून कल्याणला आलो मग बदलापूरला लोकलने, तेथून दुसऱ्या लोकलने कर्जत आणि रात्रीच्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने निघाल्याच्या चौथ्या दिवशी सकाळी दोन वाजता पुण्यात पोहोचलो.
पुण्यात पोहोचल्यानंतर सुटका झाल्याची भावना नव्हती तर ट्रेक व्यवस्थित पूर्ण केल्याचा आनंद होता. गेल्या ७० तासात रणरणत्या उन्हातून तहानेने व्याकूळ झालेलो असताना अनेकदा मनात विचार आला, की घरी बसलो असतो तर ही कटकट झाली नसती, पण कष्टाचा अनुभव घेतल्याशिवाय अडचणीतून गेल्याशिवाय सुख ( समाधान ) लाभत नाही. ह्या ट्रेकमध्ये आम्ही ते पूर्णपणे अनुभवले व एक अवर्णनीय आनंद मिळाला. आज ट्रेकडी या साहसी पर्यटनाच्या संस्थेचे कामकाज बघताना त्या अनुभवांचा खूप फायदा होतो. शाळेत असताना एक कविता पाठ करायचो "बिनभिंतीची उघडी शाळा" ह्या नावाची. ती कविता आम्ही स्वतः जगलो.
पिनाकिन् कर्वे
९८२२४४४९६३
www.trekdi.com
Published in Sakal Lifestyle
Date: April 16 2011
अनेकदा एखाद्या गडाचे नाव ऐकून तेथे जावेसे वाटते आणि केवळ ऐकीव माहितीवर जायला सुरुवात करतो. अशा वेळी पुढील घटनांची आपणांस कल्पना नसते आणि पर्वाही नसते. आम्ही मोठ्या उत्साहात जीवधन-नाणेघाट-भैरवगड अशा तीन दिवसाच्या ट्रेकसाठी निघालो होतो. थेट बस ची वेळ नीट माहिती नसल्यामुळे प्रवासाची सुरुवातच बस चुकण्याने झाली. तरीपण न डगमगता शिवाजीनगर-नारायणगाव-जुन्नर-घा
वाटाड्यांना वाटेस लाऊन आम्ही आत्मविश्वासाने चढाई सुरु केली. गडाची वाट ओढ्यातून जाते हे माहित असल्याने प्रथम ओढ्याचा शोध सुरु केला.येथून आमच्या अडचणींना सुरुवात झाली. बऱ्याच वेळाने गर्द झाडीतील एक ओढा निश्चित करून गड चढू लागलो.काही वेळाने आम्ही अशा ठिकाणी आलो जिथे गर्द झाडीने आमचा रस्ता रोखला. नंतर शोधाशोध करून आम्ही एका खड्या चढापाशी आलो. तो चढून आम्ही अशा चढापाशी आलो जेथून परतणे शक्य नव्हते आणि पुढचा मार्गही सापडत नव्हता. खाली बघितले तर पायथ्याशी गावातील टारगट पोरं जमली होती. आम्ही त्यांना वाट विचारली असता "वाघरू आले.. वाघरू आले" म्हणून घाबरवायला सुरुवात केली. तोपर्यंत प्रकाश कमी होण्यास सुरुवात झाली होती. शेवटी गडाचे नीट निरीक्षण करून एक मळलेली पाऊलवाट शोधून काढली व अंधार पडण्याच्या आत पोहोचायचे उद्दिष्ट ठेऊन वाटेतले अवघड रॉकपैच पार करून एकदाचे दुर्गावर पोहोचलो.
जीवधन हा जुन्नर विभागातील एक दुय्यम किल्ला असून हा कोकणच्या तोंडावर उभा असल्याने
दुसऱ्या दिवशी सकाळचे दोन तास स्वहस्ते चुलीवर न्याहारी करण्यात दवडले. पुढचा मोठा पल्ला गाठायचा असल्याने आवराआवर करून निघालो. येथून आमच्या पायपिटीला सुरुवात झाली. पूर्वेच्या वाटेने चढल्यामुळे आम्ही उतरायला पश्चिमेची चोर दरवाज्याची वाट घेतली. निम्मा गड उतरल्यावर आमची पुढची वाट खुंटली. चरफडतच पुन्हा चढून गडावर आलो. पुन्हा चढलेल्याच वाटेने उतरलो.
नाणेघाटात पोहोचण्यासाठी आता निम्म्या गडाला वळसा घालून जावे लागणार होते. टळटळीत उन्हातून तेथे पोहोचण्यास तास-दीड तास लागला. नाणेघाटात कोरलेले प्राचीन शिलालेख (ब्राह्मी लिपी) बघितले. नाणेघाट हा कोकणात उतरण्यासाठी पूर्वीपासून वापरात असलेला रस्ता आहे. याची निर्मिती सातवाहन राजकुळाने इ.स.पू. १०० - इ.स. ३०० दरम्यान केली.
नाणेघाटाच्या वरील अंगाचा नानाचा अंगठा चढून कोकण कड्याचे दर्शन घेऊन भोरांड्याच्या नळीच्या मार्गाला लागलो. उन्हातून चालताना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले. वाटेत कुठेही पाणी नसल्यामुळे व जवळचे पाणी काळजीपूर्वक वापरायचे असल्यामुळे तहान भागवण्यासाठी वाटेतील करवंदाच्या जाळ्यातील कच्ची करवंद व फुलं ओरबाडून खाऊ लागलो. बघता बघता भोरांड्याच्या नळीत शिरलो. अत्यंत अरुंद व न मळलेली वाट, पुरुषभर उंचीचे दगड ज्यावरून सतत उड्या मारत खाली उतरावे लागले. दोन अडीच तास उतरल्यानंतर सुद्धा सपाट प्रदेश लागत नव्हता. तोपर्यंत अंधार पडला. जरा वेळ शोधाशोध केल्यावर गाडी रस्ता सापडला. तो सापडल्यानंतर श्रमाने सर्वजण रस्त्यावरच आडवे पडले.सर्वांजवळचे पाणी संपले होते. पाण्याला अमृत का म्हणतात? हे आम्हाला तेव्हा कळले. कष्टाने तसेच उठून आम्ही मोरोशी या गावात पोहोचलो. गावाबाहेर नदीच्या पात्रात पाणी मिळाल्यावर जीव भांड्यात पडला. रात्री शाळा व मंदिर न सापडल्याने एका चावडीबाहेर मुक्काम केला. जेवणासाठी खिचडी तयार केली व जाऊन लवंडलो.
तिसऱ्या दिवशी चहा/न्याहारी करून भैरवगडाला भिडलो. कठीण चढणीचा हा भैरवगड आदल्या दोन दिवसांच्या श्रमामुळे अजूनच अवघड वाटू लागला. भैरवगड हा टेहळणी करण्यासाठी वापरला जाणारा गड आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील नैसर्गिक डाईक अश्मरचनेवरील उभारणी आणि गडावर असणारं बारमाही पाण्याचे टाके. भैरवगडावरील ही नैसर्गिक रचना प्रस्तरारोहकांसाठी आव्हानात्मक असूनही दुर्लक्षित राहिली आहे. असा हा भैरवगड उतरून आम्ही मोरोशीस परतलो. तेथून खचाखच भरलेल्या एस.टी.तून कल्याणला आलो मग बदलापूरला लोकलने, तेथून दुसऱ्या लोकलने कर्जत आणि रात्रीच्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने निघाल्याच्या चौथ्या दिवशी सकाळी दोन वाजता पुण्यात पोहोचलो.
पुण्यात पोहोचल्यानंतर सुटका झाल्याची भावना नव्हती तर ट्रेक व्यवस्थित पूर्ण केल्याचा आनंद होता. गेल्या ७० तासात रणरणत्या उन्हातून तहानेने व्याकूळ झालेलो असताना अनेकदा मनात विचार आला, की घरी बसलो असतो तर ही कटकट झाली नसती, पण कष्टाचा अनुभव घेतल्याशिवाय अडचणीतून गेल्याशिवाय सुख ( समाधान ) लाभत नाही. ह्या ट्रेकमध्ये आम्ही ते पूर्णपणे अनुभवले व एक अवर्णनीय आनंद मिळाला. आज ट्रेकडी या साहसी पर्यटनाच्या संस्थेचे कामकाज बघताना त्या अनुभवांचा खूप फायदा होतो. शाळेत असताना एक कविता पाठ करायचो "बिनभिंतीची उघडी शाळा" ह्या नावाची. ती कविता आम्ही स्वतः जगलो.
पिनाकिन् कर्वे
९८२२४४४९६३
www.trekdi.com
Published in Sakal Lifestyle
Date: April 16 2011
May 5, 2011
Tadoba Jungle Camp by TrekDi 26th Apr to 1st May 2011
Tadoba-Andhari Tiger Reserve is a Second largest Tiger Reserve of Maharashtra after Melghat Tiger Reserve with a spread over approx 650 Sq. Km area. The last Tiger Sensus estimates it to have about 42 Tigers and 22 Leopards in the reserve. Along with these rulers of jungle, this reserve is teemed with Sloth Bears, Wild dogs, Hyenas, Jackals, Indian Gaurs, Porcupines, Ratels, mongoose, Wild boars, Sambar, Spooted Deers, Munjack (Barking deeps), Four horned antelope (Chowshinga) and many more birds and other Fauna.
This jungle is divided in mainly three parts. Tadoba range, Moharli Range and Kolsa Range. Moharli and Tadoba are more popular ranges amongst three. All three area have a beautiful lakes at the center of the zone which acts as lifeline of the jungle. Along with these lakes, there are several streams, artificial and Natural water holes which are manged by Forest Department. These all parameters combine together to create rich forest eco system and provides excellent sighting and photographing opportunities of various animals and most of all tiger.
TrekDi being specialized in Wildlife and Adventure Tourism, has a soft corner towards Tadoba WLS. It has rarely happened that we have taken wildlife enthusiasts to the sanctuary and jungle hasn't satisfied them. This year we conducted camp between 26th April to 1st of May 2011. There had been some rapid pre-monsoon rains, a week prior to the Camp dates but by the time we reach Tadoba, the sky was already spotless and the area was hot for atleast 2-3 days. This was good indication. For animal watch, hot temperatures always help. Its easy to find animals who come out of jungle to drink water on various water holes and Lakes. Otherwise its impossible to locate them.
We were traveling in Open Gypsies which are excellent for animal watch as well as birding activity. In the closed vehicle, though you are sheltered from sun and dust, your view angle is limited and hence it is hard to locate birds or follow their direction. Also it become very tough for photographers. We had 3 gypsies and 6 people in each vehicle. The timing to enter forest are 6 to 10.30 in the morning and 2.30 to 6.30 in the evening. Though all vehicles enter in the forest at the same time, routes taken by each vehicle is different. So depending on your luck and observation skills you can spot/photograph wildlife without any disturbance.
We had four consecutive rides in the Jungle of which 3 were conducted in Tadoba and Moharli zone and 1 was conducted in Moharli and Kolsa zone. The various destination we visited during these rides are as follows
1. Katezari
2. Jamunzari
3. Telia Dam
4. Vasant Bandhara
5. Tadoba Lake
6. Pandharpowni water hole
7. Water hole no 97
8. Kala Amba
9. Kolsa Lake
10. Vanarchuva
11. Ramsing Amba
We had tiger sightings at following location
1. Pandhar powni to waterhole 97 road : Adult male(Gender noted from secondary information, it wasn't noted on the field)
a Glimpse of tiger for just 11 seconds, not everyone from vehicle could get a chance to see the tiger. Only 3 people among 6 spotted it.
2. Jamunzari water hole: Adult Male
After crossing Vasant Bandhara and a small hill complex we descend down to the water hole of Jamun zari where a small stream bund under a huge Jamun tree has created a cool place, ideal for tiger resting. When we reached there around 4pm it was sitting under the tree and we could spot his belly, ears from the binoculars. After we waited for almost 1.30Hrs, around 5pm it moved from that resting point and came to the waterhole adjacent to that resting place. It walked majestically and sat in open in the waters of small stream outlet from the water hole. Since we had to catch the Gate timings we could enjoy it for just 10 minutes and then we had to leave. There were almost 6-7 gypsies which enjoyed the view of this tiger.
3. Pandharpowni water hole: 3 cubs about 4 months old
We knew that there are 4 cubs and a female tigress in the area and they come out regularly in the morning for last several days to a water hole in pandhar powni area where the tigress had a kill of Sambar. We after visiting several other areas reached for the waterhole at their timing. They made us wait for almost 75 minutes and then 3 cubs came out. Tigress and last cub didn't came out but we had excellent sighting of 3 cubs. Though we had a distance of about 70-80 m to the waterhole from where our vehicles stood, the light was good and hence no trouble in spotting the cubs. After having water and little fun in the water all three cubs one by one got out of the water and disappeared in the bamboo thicket.
4. Telia Dam Tiger: (Adult Male)
This was our last ride of the trip and we had scheduled our visit to Kolsa region. After having some excellent birding spots and visiting the empty Kolsa lake we were returning to Moharli Gate. Just about a Km before we reach gates we spotted this tiger sitting under a bamboo thicket. We could see this tiger from just 15 ft distance. After 2-3 minutes, tiger started walking and got disappeared in the bush. It emerged again on the Telia dam road and gave some excellent photographs while doing salt licking and territory marking.
5. Chandrapur - Moharli Road : (Gender unknown)
For little errands we went to Chandrapur and coming back to Moharli campsite around 9.30 in the night and suddenly we saw a car which its upper light ON. We got confused and stopped near that car to ask whether they have any problem. That car shifted a bit and in its light we could spot an Adult tiger just 10-15 ft from us. The tiger seemed very shy and immediately got irritated by the headlight and escaped in the jungle within minute.
6. Leopard on Moharli - Tadoba Road
Checklists
A] Checklist of the Birds we spotted during the trip
1. Black Shouldered Kite
2. Montagu's Harrier
3. Crested Serpent Eagle
4. Crested Hawk Eagle
5. Grey Headed Fishing Eagle
6. White Eyed Buzzards
7. Oriental Honey Buzzard
8. Osprey
9. Shikra
10. Spotted Owlet
11. Common Myna
12. Brahmny Stirling
13. Pied Stirling
14. Rufous Treepie
15. Greater Racket Tailed Drongo
16. Black Drongo
17. White bellied drongo
18. Koel
19. Eurasian Hawk Cuckoo
20. Indian Pitta
21. Brown Headed barbet
22. Coppersmit Barbet
23. Golden Oriole
24. Black Hooded oriole
25. Sirkeer Malkoha
26. Spotted Dove
27. Eurasian collard Dove
28. Laughing Dove
29. Oriental Turtle Dove
30.Yellow Footed green pigeon
31. Jungle Babbler
32. Malabar Whistling Thrush
33. Orange Bellied Ground Thrush
34. White Browed Fantail Flycatcher
35. Paradise Flycatcher
36. Black Naped Monarch
37. Black Naped Flameback woodpecker
38. Green Bee eater
39. Red Vented Bulbul
40. Red Whiskered Bulbul
41. Rose ringed Parakeet
42. Plum headed parakeet
43. Purple sunbird
44. Yellow Throated Sparrow
45. House Sparrow
46. Junge crow
47. Common Crow
48. Grey Jungle Fowl
49. Indian Peafowl (Peacock)
50. Jungle Bush Quail
51. Mapie Robin
52. Indian Robin
53. Yellow Wagtail
54. Ashy Prinia
55. Ashy crowned Fish Lark
56. Common Crested Lark
57. Small blue Kingfisher
58. White throated Kingfisher
59. Pied Kingfisher
60. Indian Roller
61. Bronzed Winged Jacana
62. River Tern
62. Lesser Whistling ducks
63. Cotton Pygmy goose
64. Black ibis
65. White Ibis (Black headed ibis)
66. Open billed Stork
67. Pond Heron
68. Purple Heron
69. Cattle Egret
70. Little Egret
71. Greater Egret
72. Purple moorhen
73. Coot
74. Indian cormorant
75. Red wattled Lapwing
76. Greater Coucal
77. Pied Bushchat
78. Savanna Nightjar
B] Butterfly Checklist
1. Spot Swordtail
2. Crimson Rose
3. Common rose
4. Common mormon
5. Baronet
6. Tawny Coster
7. Common Baron
8. Common Leopard
9. Plain tiger
10. Stripped Tiger
11. Blue Tiger
12. Lemon Pansy
13. Blue Pansy
14. Peacock Pansy
15. Grey Pansy
16. Dark Grass Blue
17. Gram Blue
18. plain Cupid
19. Common grass Yellow
20. Common Emmigrant
21. Common Lime
22. Common Gull
23. Psyche
C] Check list of Mammals
1. Indian tiger
2. Indian Leopard
3. Spotted Deer
4. Sambar
5. Munjack (Barking Deer)
6. Blue bull
7. Wild boar
8. Wild dogs
9. Sloth bear
10. Common Mongoose
11. Black Naped Hare
12. Five stripped Squirrel
13. Tree Shrew
14. Field Rats
Other
1. Monitor Lizard
2. Indian Marsh Crocodile
- Written by Pinakin Karve
Subscribe to:
Posts (Atom)