April 8, 2010

तक्रार निवारण

काय म्हणालात ?
प्रवास खूप लांबचा आहे ?
अहो असणारच
स्वर्ग जर जवळ असता
तर आळस किती चढला असता
मग काय ? स्वर्गाची भेट घडली ना ?
दूर गेल्यावर स्वर्ग भेटतो हे
आता तरी पटल ना ?

काय म्हणालात उकडतय ?
अहो उकडणारच
जो पर्यंत आपण आहोत पृथ्वीवर
आणि सूर्य आकाशात
तो पर्यंत आपल्याला घाम येणारच
झाडाच्या सावलीत कस वाटत हे कळाव
म्हणून आम्ही तुम्हाला उन्हात नेणारच

काय म्हणालात ?
पाय दुखत आहेत ?
अहो दुखणारच
कित्येक मैल चालत गेल्यावर
डोंगरमाथ्याला भिड़ल्यावर
विसाव्याची गोडी कशी असते
हे तुम्हाला कळाव म्हणून
आम्ही तुम्हाला चालवणारच

काय म्हणालात ?
संडासच नव्हता ?
अहो नसणारच
पण आहो एक मात्र बर झाल
आपण वस्तूंचे गुलाम असतो
हे आपल्याला एकदा तरी पटल
तरीही संडास नव्हता
म्हणून कुणाचे काही नाही अडले


काय म्हणालात
वाघ दिसला नाही ?
अहो कसा दिसेल ?
अपन त्याला पाहण्या पूर्वी
त्यानेच आपल्याला पाहिले असेल

ठीक आहे
एव्हड्या दूर जावून फुलपाखरू तर दिसले ना ?
आता पुढची पायरी वाघाची
बात करा की थोड्या धिराची

- मूळ कविता किरण पुरंदरे लिखित

1 comment:

  1. awesome!! .. next time i m sure, before uttering a word of complaint, i will recollect this poem, and shut my mouth :D. kaay mhanalaat?? No comments :P

    Your trekking friend
    Gayatri

    ReplyDelete